Tarun Bharat

उत्तराखंडात मागील 24 तासात 3,626 नवीन कोविड रुग्ण; 70 मृत्यू 

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात काही प्रमाणात रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 3 हजार 626 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 70 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 8 हजार 731 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 07 हजार 566 इतकी झाली आहे. यातील 2 लाख 33 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 38,810 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 699 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 383, हरिद्वारमध्ये 535, नैनिताल 555, उत्तरकाशीमध्ये 89, पौडीमध्ये 177, टिहरी 129, अल्मोडा 187, रुद्रप्रयाग 193, चमोली 238, चंपावत 48, पिथोरागडमध्येे 178 आणि बागेश्वर जिल्ह्यात 215 रुग्ण आढळून आले आहेत. 


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 5,600 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 63,373 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.84 % तर मृत्यू होण्याचे प्रमाण 1.82 % इतके आहे. 

Related Stories

बिगूल वाजणार !

Patil_p

जम्मू काश्मीर : केंद्र सरकार 4जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत

Tousif Mujawar

कोरोनापासून वाचण्यासाठी आदिवासींचा उपाय

Patil_p

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीला प्रारंभ

mithun mane

एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

Patil_p

पंजाब : कोरोना रुग्णांनी ओलांडला 2 लाखांचा आकडा

Tousif Mujawar