Tarun Bharat

उत्तराखंडात मागील 24 तासात 473 नवे कोरोना रुग्ण; 09 मृत्यू

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 473 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 64 हजार 538 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 11,147 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 473 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 17, बागेश्र्वर 02, चमोली 48, चंपावत 03, देहरादून 163, हरिद्वार 55, नैनिताल 39, पौरी गरवाल 40, पिथोरगड 14, रुद्र प्रयाग 16,तेहरी गरवाल 12, यू एस नगरमधील 57 आणि उत्तर काशीमधील 07 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल 404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 59,227 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.77 टक्के इतके आहे. तर सध्या 03 हजार 736 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1056 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

समलिंगी विवाहप्रकरणी राज्यांकडून चर्चेची मागणी राजस्थानचा विरोध

Patil_p

कुख्यात गुंड विकास दुबेला मध्यप्रदेशच्या उज्जैनमधून अटक

Tousif Mujawar

बरे झाले… नोकरी गेली

Patil_p

‘चक्का जाम’साठी शेतकरी रस्त्यावर

Patil_p

राष्ट्रपती पदासाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू

Patil_p

आरबीआयकडून व्याजदरात पाव टक्के कपात शक्य

Patil_p
error: Content is protected !!