Tarun Bharat

उत्तराखंडात मागील 24 तासात 546 नवीन कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात काही प्रमाणात रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 546 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 2 हजार 717 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 34 हजार 965 इतकी झाली आहे. यातील 3 लाख 10 हजार 291 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 24,439 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 136 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 41, हरिद्वारमध्ये 69, नैनिताल 56, उत्तरकाशीमध्ये 8, पौडीमध्ये 7, टिहरी 33, अल्मोडा 43, रुद्रप्रयाग 16, चमोली 23, चंपावत 13, पिथोरागडमध्येे 88 आणि बागेश्वर जिल्ह्यात 13 रुग्ण आढळून आले आहेत. 

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.63%


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 6,797 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 11,885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.63 % तर मृत्यू होण्याचे प्रमाण 2.03 % इतके आहे. 

Related Stories

जम्मू : मास्क न घातल्यास 500 रु, तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 3 हजार रुपये दंड

Tousif Mujawar

मी उपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा दिला असता : आदित्य ठाकरे

Abhijeet Khandekar

म्यानमारला चांगलीच भोवली ‘कोविड’ची साथ

Patil_p

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

Patil_p

विश्व हिंदू महासभा प्रदेशाध्यक्षांची हत्या

Patil_p

तृणमूल काँगेसमध्ये उफाळला संघर्ष

Patil_p