Tarun Bharat

उत्तराखंडात 120 नवे कोरोना रुग्ण; 330 जणांना डिस्चार्ज

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 120 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 94 हजार 923 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 11,730 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 120 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 4, बागेश्र्वर 0, चमोली 03, चंपावत 0, देहरादून 36, हरिद्वार 23, नैनिताल 38 पौरी गरवाल 0, पिथोरगड 1, रुद्र प्रयाग 1, तेहरी गरवाल 00, यू एस नगरमधील 10 आणि उत्तर काशीमधील 4 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 89,882 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.69 टक्के इतके आहे. तर सध्या 2 हजार 354 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 2,136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

जम्मू : पाकिस्तानकडून गोळीबार सुरू; दोन जवान शहीद तर चारजण जखमी

Rohan_P

कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली 

Rohan_P

छत्तीसगड : दुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

चार राज्यांमध्ये लसीची जलद चाचणी

Omkar B

सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी केला वार्तालाप

Patil_p
error: Content is protected !!