Tarun Bharat

उत्तराखंडात 386 नवे कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 69 हजार 693 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,179 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 386 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 05, बागेश्र्वर 13, चमोली 21, चंपावत 5, देहरादून 137, हरिद्वार 35, नैनिताल 53, पौरी गरवाल 29, पिथोरगड 37, रुद्र प्रयाग 8,तेहरी गरवाल 13, यू एस नगरमधील 25 आणि उत्तर काशीमधील 04 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल 388 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 63,808 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.56 टक्के इतके आहे. तर सध्या 4 हजार 133 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

ऍमेझॉनने गाठला 10 लाख विक्रेत्यांचा टप्पा

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

Patil_p

योगी आदित्यनाथांचा आज शपथविधी

Amit Kulkarni

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक नक्षलवादी ठार

Archana Banage

‘आयएनएस चेन्नई’वरून ‘ब्रह्मोस’चा यशस्वी मारा

Patil_p

तबलिगीच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी करणार

Patil_p