Tarun Bharat

उत्तराखंडात 48 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 48 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 02 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 96,673 इतकी आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून सद्य स्थितीत 669 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,255 नमुने निगेटिव्ह आले. देहरादूनमध्ये 17 नवे रुग्ण आढळून आले. चमोली 3 हरिद्वार 7, नैनिताल 14, अल्मोडा आणि पिथौरागड मध्ये प्रत्येकी एक, उधमसिंह नगर 3 आणि  टिहरीमध्ये 2 रुग्ण आढळून आले. तर अन्य पाचही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1675 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 92, 950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15% इतके आहे. 

  • उत्तराखंडात चौथ्यांदा लसीचा पुरवठा 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तराखंडात कोविड लसीचा चौथ्यांदा पुरवठा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1 लाख 93 हजार 500 कोविडशिल्ड लस विशेष विमानाने उत्तराखंडात पाठवली आहेत. यावेळी ही लस फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Related Stories

कोरोनाची दुसरी लाट : RBI कडून आरोग्य क्षेत्राला 50 हजार कोटींची मदत

Tousif Mujawar

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील प्रचार समाप्त

Patil_p

लोकसभा सदस्यत्वाचा सुप्रियोंकडून राजीनामा

Patil_p

देशात 2026 मध्ये धावणार बुलेट ट्रेन

Patil_p

गेल्यावर्षीपेक्षा यावेळी सज्जता अधिक

Patil_p

मतदार ओळखपत्रही आता डिजिटल

Patil_p
error: Content is protected !!