Tarun Bharat

उत्तराखंडात 49 नवे रुग्ण; ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 4 टक्क्यांनी कमी

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर 49 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 96,722 इतकी झाली आहे. तर 63 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 9,845 नमुने निगेटिव्ह आले. तर पाच जिल्ह्यांमध्ये 49 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देहरादून मध्ये 23 नवे रुग्ण आढळून आले. हरिद्वार 11, उधमसिंह नगर 4, चमोली 2, नैनिताल 6, चंपावत, पौडी आणि  टिहरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. तर अन्य 5 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1678 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 63 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 93,013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 % इतके आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून सद्य स्थितीत 648 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

युपीत माफिया न बाहुबली, केवळ बजरंगबली

Patil_p

चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची देशव्यापी यात्रेची घोषणा

Abhijeet Khandekar

‘आयुष्मान’चा विस्तार 40 कोटी लोकांपर्यंत पोहचविणार

Patil_p

बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

मानवाप्रमाणे गुगल विचार करणार ?

Patil_p

राकेश अस्थाना प्रकरणी केंद्राला नोटीस

Patil_p
error: Content is protected !!