Tarun Bharat

उत्तराखंड : दिवसभरात 398 नवे कोरोना रुग्ण; 10 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात दिवसभरात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 हजार 677 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, आज 9,110 रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर नवीन आढळलेल्या 398 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 32, बागेश्र्वर 11, चमोली 57, चंपावत 00, देहरादून 90, हरिद्वार 09, नैनिताल 46, पौरी गरवाल 61, पिथोरगड 26, रुद्र प्रयाग 20 , तेहरी गरवाल 05, यू एस नगरमधील 31 आणि उत्तर काशीमधील 10 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 59,924 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.24 टक्के इतके आहे. तर सध्या 04 हजार 149 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

सर्व राफेल लढाऊ विमाने एप्रिल 2022 पर्यंत मिळणार

Patil_p

सीबीआयच्या माजी संचालकावर कारवाईची शिफारस

Patil_p

बोईंगकडून अपाचे, चिनूकचा भारताला पुरवठा

datta jadhav

भारताने दौलत बेग ओल्डी येथे तैनात केला T-90 टँकचा ताफा

datta jadhav

लिहायची सवय सुटतेय, एकाग्रचित्तही नाही!

Patil_p

भारत पुन्हा आर्थिक भरारी घेईल !

Patil_p
error: Content is protected !!