Tarun Bharat

उत्तराखंड महाप्रलय : 203 जण बेपत्ता; 11 मृतदेह हाती

ऑनलाईन टीम / देहरादून : 

उत्तराखंडच्या चमोलीतील जोशींमठ येथे हिमकडा कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 11 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. या दुर्घटनेत जवळपास 203 लोक बेपत्ता झाले आहेत. कालपर्यंत आम्हाला एका तपोवन प्रकल्पाबद्दल माहिती नव्हती. तपोवन येथील दुसऱ्या बोगद्यात जवळपास 35 जण अडकले आहेत. मदत कार्याच्या दुसऱ्याही दिवशीही आज एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांचे पथक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत, असे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1358645556306792448?s=19

आपत्तीग्रस्त तपोवनमध्येही सध्या मदत कार्य सुरू आहे. डीआयजी आयटीबीपी अपर्णा कुमार यांनी सांगितले की, मुख्य बोगदा जेसीबीच्या सहाय्याने 70 ते 80 मीटरपर्यंत स्वच्छ करण्यात आला आहे. हा बोगदा 100 मीटर लांब असून 30 ते 40 कर्मचारी बोगद्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Related Stories

मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होती : शरद पवार

Archana Banage

सात हजारांहून अधिक गावांना मिळणार 4G कनेक्टिविटी

datta jadhav

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूला ‘रौप्य’

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार

Tousif Mujawar

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, ५ कर्मचारी जखमी

Archana Banage

गोकुळचा बायोगॅस प्रकल्प दूध उत्पादकांसाठी फायदेशीर

Abhijeet Khandekar