Tarun Bharat

उत्तराखंड : विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडचे विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि मुलाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 


विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांनी सर्व शुभेच्छुकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचा परिवार आणि स्टाफ मेंबर्सचे नमूने सोमवारी घेण्यात आले होते. त्या सर्वांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत. 


दरम्यान, प्रदेशातील भाजप अध्यक्ष बंशीधर भगत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल हे आयसोलेट झाले होते. त्यानंतर आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते आता पहिल्या प्रमाणे कामाला सुरुवात करतील. 

Related Stories

बेल, गूळ, चुन्यातून साकारतेय मंदिर

Amit Kulkarni

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडला

Omkar B

रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ; EMI वाढणार

datta jadhav

नवज्योत सिंह सिद्धू यांची लवकरच सुटका

Patil_p

दीपक कोचर यांना 19 पर्यंत इडीची कोठडी

Patil_p

धान्यशेतीतून पाण्याची बचत

Patil_p