ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 47 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 400 पेक्षा कमी आली आहे. यासोबतच प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 96, 820 इतकी झाली आहे.


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 7598 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 26 रुग्ण आढळले. तर हरिद्वारमध्ये 2, नैनिताल 9, उधमसिंह नगर 8, चमोली आणि अल्मोडामध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आला आहे. तर रुद्रप्रयाग, चंपावत, पौडी, बागेश्वर, टिहरी, पिथोरागड आणि उत्तरकाशीमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
सद्य स्थितीत 388 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कालच्या दिवशी 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 93 हजार पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1690 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.4 % इतके आहे.