Tarun Bharat

उत्तरेच्या शीतलहरींनी मुंबईकर गारठले !

Advertisements

कमाल-किमान-आर्दताही घटली,

किमान तापमान 12-13 अंशावर येणार

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या कुलाब्यापासून उत्तरेकडे बोरिवली ते विरार तर पूर्व उपनगरात मुलुंड-ठाणे-कल्याणपर्यंत तसेच पूर्वेला पनवेलपर्यंत पसरलेल्या मुंबईत किमान तापमानाचा पारा 15 ते 12 डिग्री सेल्सिअसवर घसरला आहे. अशा वातावरणाला मुंबईकर सरावलेले नसल्याने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. आज रात्री पुन्हा दोन्ही तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज पश्चिम हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

गुलाबी थंडीची वाट पाहणाऱया मुंबईकरांसाठी सध्या उत्फुल्ल वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून मुंबईत गारवा सुरू आहे. आज मुंबईतील किमान तापमान, कमाल तापमान व आर्द्रता हे तिन्ही घटक घसरल्याची नोंद करण्यात आली. किमान व कमाल तापमान घसरण्यासोबत आर्द्रतेची टक्केवारी कमी होण्याची घटना क्वचित घडत असते. बोरिवली 13 डिग्री सेल्सिअस तर गोरेगाव 14, पवई 14, कां†िदवली व पनवेल 12 डिग्री सेल्सिअस एवढी नेंद करण्यात आली. मुंबईतील आजच्या किमान तसेच कमाल तापमानात घसरण झाली. ही घसरण बुधवारच्या नोंदीपेक्षा कमी असल्याचे मुंबई वेधशाळेकडून सांगण्यात आले. तर मुंबई शहरात कमाल तापमान 26 तर सांतापूझ येथे 25 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली. तर शहरातील आर्द्रता 58 टक्के व उपनगरात 46 टक्के एवढी नोंद करण्यात आली.

झाशी-जबलपूर-नागपूर मार्गे थंडी मुंबईत

सध्या उत्तरेकडे शीतलहरींचा प्रभाव दिसून येत असून ईशान्येकडील शीतलहरी मुंबईत दाखल झाल्या आहेत. ही थंडी लखनौ-अलाहाबादöझाशी-भोपाळö जबलपूर-नागपूरöऔरंगाबाद-नांदेड ते मुंबईत दाखल झाली असल्याचे हवामान

तज्ञ अंकुर पुराणिक यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया :

आजची रात्र 2020 वर्षातील सर्वात कमी किमान तापमान नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शीतलहरींमुळे मुंबईतील रात्र अधिक थंड होऊ शकते. यावेळी वारेदेखील प्रभावी वाहतील. किमान तापमान 12-13 वर येणार असून वाऱयामुळे 9-10 अंश सेल्सिअस प्रमाणे थंड असेल.

– प्रा. श्रीधर सुब्रमण्यम, वेदरस्टडी, आयआयटी.

Related Stories

दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला होणार रवाना

Abhijeet Shinde

हिंदुत्व मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल : मा.गो. वैद्य

prashant_c

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 12,711 वर

Rohan_P

शरद पवार हे अर्धसत्य सांगत आहेत-देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

राज्यात आज ३५० नवीन कोरोना रुग्ण

prashant_c

‘एनआरएस’ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार : जितेंद्र आव्हाड

Rohan_P
error: Content is protected !!