Tarun Bharat

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

Advertisements

1500 किमीचा मारक पल्ला , जपानला करू शकते लक्ष्य

वृत्तसंस्था / प्योंगयांग

उत्तर कोरियाने रविवारी दीर्घ मारक पल्ल्याच्या नव्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम असल्याचे समजते. या मारक पल्ल्यामुळे उत्तर कोरिया आता जपानच्या बहुतांश हिस्स्यांना लक्ष्य करू शकतो. हे क्रूज क्षेपणास्त्र दोन वर्षांपासून तयार केले जात होते. या क्षेपणास्त्रात आण्विक क्षमतायुक्त यंत्रणा असल्याचा संशय अमेरिकेच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे सामरिक अस्त्र असून ते देशाच्या सैन्यसामर्थ्यात वाढ करण्याच्या किम जोंग उन यांच्या व्हिजनला अनुरुप असल्याचे उत्तर कोरियाकडून म्हटले गेले आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यात उत्तर कोरियाने कमी अंतराचा मारक पल्ला असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाचे आण्विक वाटाघाटीकार टोकियोत भेटणार असताना उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा केली आहे.

जपानची चिंता वाढली

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवरून आम्ही चिंतेत आहोत. आम्ही अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबत मिळून यावर देखरेख ठेवणार असल्याचे जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव कात्सुनोबू कातो यांनी म्हटले आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरिया स्वतःच्या सैन्य कार्यक्रमाला विकसित करण्यावर लक्ष देत असल्याचे समजते. तसेच तो स्वतःचे शेजारी देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकरता धोका वाढवत असल्याचे युएस इंडो पॅसिफिक कमांडकडून सांगण्यात आले.

बंदीचा परिणाम नाही

उत्तर कोरियाने स्पष्ट शब्दांमध्ये कबुली दिली नसली तरीही हे क्षेपणास्त्र म्हणजे आण्विकक्षमता युक्त यंत्रणेचेच दुसरे नाव असल्याचे विधान कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसच्या एका तज्ञाने म्हटले आहे. 2009 मध्ये आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम रोखण्यासंबंधी चर्चा बंद झाल्यावर उत्तर कोरियाने सातत्याने स्वतःच्या शस्त्रास्त्र क्षमतांचा विस्तार सुरूच ठेवल्याचे या क्षेपणास्त्र चाचणीतून स्पष्ट होते. संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये माथेफिरूच्या गोळीबारात सहा ठार

Patil_p

कराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव

datta jadhav

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

नीरव मोदीच्या भावावर अमेरिकेत अपहाराचा गुन्हा

Patil_p

रशियन संसदेचे युटय़ूब चॅनेल ब्लॉक

Patil_p

ब्राझीलमध्ये 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav
error: Content is protected !!