Tarun Bharat

उत्तर कोरियाने समुद्रात डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

दोन्ही क्षेपणास्त्रs जपाननजीक कोसळली

वृत्तसंस्था/ प्योंगयांग

उत्तर कोरियाने बुधवारी 2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs समुद्रात डागली आहेत आणि याद्वारे या देशाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केल्याचे मानले जात आहे. दोन्ही क्षेपणास्त्रs जपाननजीक एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनबाहेर ती कोसळली आहेत.  चीनचे विदेशमंत्री दक्षिण कोरियाच्या दौऱयावर असताना उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले आहे.

एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधीत उत्तर कोरियाने दुसऱयांदा क्षेपणास्त्र डागले आहे. समुद्रात कोसळण्यापूर्वी या क्षेपणास्त्रांनी 880 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या क्षेपणास्त्र चाचणींचे विश्लेषण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा करत आहेत.

क्षेपणास्त्र डागण्याची वेळ चीन आणि जपानसाठी एकप्रकारचा संकेत होता असे जाणकारांचे मानणे आहे. चीन आणि उत्तर कोरिया तसे परस्परांचे घनिष्ठ मित्र आहेत, पण दोघांच्या संबंधात कित्येकदा तणावही निर्माण झाला आहे.

Related Stories

उलटय़ा डोक्यासह झाला होता जन्म

Patil_p

लाल सागरातील ‘शापित’ ब्ल्यू होल

Patil_p

कोरोना : बीजिंगमध्ये 5 लाख लोक घरात बंदिस्त

datta jadhav

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास घडते चांगले कार्य : महापौर

Tousif Mujawar

मुत्सद्दी कीव्हमध्ये परतल्यास याद राखा

Patil_p

जगातील सर्वात अवघड प्रवेश परीक्षा ‘सुनेयुंग’

Patil_p