ऑनलाईन टीम / गजियाबाद :
उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री आणि गजियाबादचे आमदार अतुल गर्ग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांना ताप आल्याने आणि घसा दुखत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. काल रात्री उशिराने त्यांचे रिपोर्ट आले असता त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत.


आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरातील अन्य लोकांची देखील टेस्ट केली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी आरटी पीसीआर लॅब चे उद्घाटन करण्यापूर्वी गर्ग यांनी टेस्ट केली होती. त्यावेळी त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
याबाबत गर्ग यांनी स्वतः माहिती दिली होती. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी माझी आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. त्यात माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र काल रात्री रैपिड एंटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. यासाठी माझी कोणतीही मदत हवी असल्यास मला किंवा माझे सहकारी राजेंद्र मित्तल, अजय राजपूत यांना फोन वरून संपर्क करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.