Tarun Bharat

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ मोती सिंह यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र प्रताप सिंह यांची तब्येत बिघडली असता त्यांची कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. कॅबिनेट मंत्री राजेंद्र सिंह हे प्रतापगडच्या पट्टी विधानसभेचे आमदार आहेत. 


दरम्यान, उत्तर प्रदेशात मागील 24 तासात 998 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7451 इतकी झाली आहे. तसेच 17 हजार 557 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 749 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

बोबडय़ा मुलीच्या गाण्याने जिंकली मनं

Patil_p

सावंतवाडीत इलेक्ट्रॉनिक गोदामाला आग

Rohan_P

प्रणव मुखर्जींच्या पुत्राचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Patil_p

उत्तराखंडात कोरोना रुग्णांनी पार केला 75 हजारांचा टप्पा

Rohan_P

ब्लॅक फंगसवरील औषधे करमुक्त

Patil_p

पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून १० हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!