Tarun Bharat

उत्तर प्रदेशच्या मजूरांना परत आणणार : योगी आदित्यनाथ

Advertisements

ऑनलाईन टीम / लखनऊ :


परराज्यातील अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजूरांना परत आणणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. 


ते म्हणाले, देशातील इतर भागांमध्ये असणाऱ्या राज्यातील स्थलांतरीत मजुरांना टप्याटप्याने त्यांच्या मूळ गावी, त्यांच्या घरी आणले जाणार आहे. यासाठी त्यांनी विविध राज्यात अडकलेल्या मजुरांची यादी तयार करण्याबाबत विचारणा त्यांनी प्रशासनाला केली आणि ज्या मजुरांनी 14 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे, त्यांना परत आणले जाईल. असं ही त्यांनी स्पष्ट केले. 

सध्या परराज्यातील अडकलेल्या मजूरांना सीमेपर्यंत आणल्यानंतर त्यांचे टेस्टिंग केले जाईल आणि टेस्टच्या अहवालानुसार, या मजुरांना जिल्ह्याच्या ठिकाणी 14 दिवस क्वारंटाईन पूर्ण केल्यावर त्यांच्या गावी जाता येणार आहे.

आपल्या गावी परत जाताना या मजुरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, शिधा आणि एक हजार रुपये रोख देले जाणार आहेत. असं ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

आणखी 3 राफेल भारतभूमीत दाखल

Amit Kulkarni

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

Patil_p

देशात गेल्या 24 तासात 1553 नवे रुग्ण, 36 जणांचा मृत्यू

prashant_c

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

Patil_p

आझादांकडून नव्या पक्षाची घोषणा

Patil_p

…तर महाराष्ट्र पेटेल; बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

Archana Banage
error: Content is protected !!