Tarun Bharat

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशात कोरोनाच्या कप्पा विषाणूचे रुग्ण सापडू लागले आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचे उपाय योजले जात आहेत. मात्र, हा फक्त कोरोनाचा एक प्रकार असून त्यावर उपचार शक्य आहेत, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये कप्पा विषाणू आढळून आला असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 107 रुग्ण आढळून आल्यानंतर आता कप्पा व्हेरिएंटचे रुग्ण देखील सापडले आहेत.

  • कप्पा विषाणूवर उपचार शक्य 


याबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की प्रदेशात कप्पा विष्णूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हायरल अद्याप चिंतेचं कारण नाही. हा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट आहे आणि त्यावर उपचार करणे शक्य आहे. 

  • 2020 मध्ये भारतात पहिल्यांदा आढळला होता कप्पा 


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत WHO ने हा विषाणू चिंतेचे कारण ठरला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p

कुपवाडात चकमक; अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद

datta jadhav

एकाच घराच्या ४ खोल्या महाराष्ट्रात, ४ तेलंगणात..?

Rohit Salunke

सांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

Archana Banage

उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्गावर स्फोट

Patil_p