Tarun Bharat

उत्तर प्रदेशात फक्त ‘जंगलराज’ : अनिल देशमुख

ऑनलाईन टीम / मुंबई : 


हाथसर सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. आता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. 

उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य राहिले नसून, राज्यात फक्त ‘जंगलराज’ आहे, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला.

 
ते म्हणाले, गेल्या काही महिन्यापासून योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांना सल्ले देत होते. मात्र त्रास योगी सरकारच्या यूपीत जंगलराज आहे, सर्व प्रथम त्यांनी आपल्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करावे आणि जंगलराजावर कडक कारवाई करावी, असा सल्ला देखील दिला आहे.


दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारातील 22 वर्षीय दलित तरूणीचा बुधवारी सकाळी दिल्लीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Related Stories

तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात ; राऊतांची भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर टीका

Archana Banage

निर्बंधांची वेळ येण्यापेक्षा नियम पाळा

Patil_p

इन्फोसिसच्या 80 हजार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉर्म होम

datta jadhav

राफेल प्रकरणी स्वतंत्र सुनावणी नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Archana Banage

रणजित जाधव यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

Patil_p

राजस्थानमध्ये कोरोना बाधिताची संख्या 20 हजार पार

Tousif Mujawar