Tarun Bharat

उत्तर प्रदेश, उत्तराखंड,गोव्यात पुन्हा भाजप सरकार?

ओपिनियन पोलचे अनुमान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे वर्चस्व  

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या मार्चमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मिझोराम आणि उत्तराखंड यांच समावेश आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटर या संस्थांनी मतदानपूर्व सर्वेक्षण प्रसिद्ध पेले असून उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांमध्ये पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार असे अनुमान या सर्वेक्षणात काढण्यात आले आहे. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाचे वर्चस्व राहणार असून काँगेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला विधानसभेच्या 400 जागांपैकी 259 ते 269 जागा आणि 42 टक्के मते मिळू शकतात. तर समाजवादी पक्षाला 109 ते 117 जागा आणि 30 टक्के मते मिळू शकतात. बसपला 12 ते 16 जागा आणि 16 टक्के मते मिळू शकतात. काँगेसचा धुव्वा उडणार असून त्या पक्षाला केवळ 5 टक्के मते आणि 3 ते 5 जागा मिळू शकतात असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.

गोवा, उत्तराखंडात भाजप

गोव्याच्या 40 जागांपैकी भाजपला 22 ते 26 जागा, काँग्रेसला 3 ते 7 जागा, आम आदमी पक्षाला 4 ते 8 जागा तर अन्य पक्षांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. उत्तराखंडात पुन्हा भाजपचे सरकार येणार असून तेथील 70 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 44 ते 48 जागा, काँगेसला 19 ते 23 जागा तर आम आदमी पक्षाला 0 ते 4 जागा मिळण्याचे अनुमान व्यक्त करण्यग्नात आले आहे.

पंजाबमध्ये उलटफेर

पंजाबमध्ये आम आदमी पक्ष काँगेसला मागे टाकण्यग्नाची शक्यता आहे. या राज्यातील 117 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा आणि 35 टक्के मते, काँगेसला 38 ते 46 जागा आणि 29 टक्के मते, अकाली दलाला 16 ते 24 जागा आणि 22 टक्के मते, तर भाजपला 1 ते 2 जागा आणि 7 टक्के मते मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.

आदित्यानाथ लोकप्रिय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीवर त्या राज्यातील 45 टक्के मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून 22 टक्के मतदारांना अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत.

Related Stories

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना !

Patil_p

आता डिजिटल मीडियाशी संबंधित पत्रकारांनाही मिळणार ओळख

Rohit Salunke

देशात दिवसभरात 60,753 नवे रुग्ण

Patil_p

एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाचे संभाषण व्हायरल

Archana Banage

मॉडर्ना लसीला भारतात अनुमती

Patil_p

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आठ पदरी करा -अजित पवारांची मागणी

Abhijeet Khandekar