Tarun Bharat

उत्तर प्रदेश : भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना कोरोनाची बाधा

Advertisements

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः स्वतंत्र देव यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझ्यात कोरोनाची थोडी लक्षणे दिसत होती. त्यामुळे मी कोविड 19 ची टेस्ट केली. या टेस्टमध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. 


सध्या माझी प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी होम क्वारंटाइन आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी आवाहन करतो की, त्यांनी स्वतः क्वारंटाइन व्हावे, आणि आवश्यकता असल्यास स्वतःहून कोरोनाची तपासणी करावी. तसेच मी सर्वांना आवाहन करतो की, सरकार देण्यात आलेल्या गाईड लाईनचे पालन करावे. 

Related Stories

हरियाणाचा दुधवाला 5 वर्षात 7 हजार कोटींचा मालक कसा होतो?

datta jadhav

गव्याने बंद पाडला सांगलीचा बाजार

Abhijeet Shinde

पाकिस्तानात दोन पॅसेंजर ट्रेन्सची धडक; 30 ठार

datta jadhav

आसाममध्ये पुरामुळे 22 लाख लोक प्रभावित

Patil_p

रविवारी होणार सर्वपक्षीय बैठक

Patil_p

‘मी मोदींचा हनुमान’ : चिराग पासवान

Patil_p
error: Content is protected !!