Tarun Bharat

उत्तर प्रदेश : भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रीता यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यानंतर त्यांना लखनऊ मधील एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान, उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 5,776 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत एकूण 1 लाख 85 हजार 812 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 57,598 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 3691 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

Related Stories

Porn apps Case : राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक

Archana Banage

‘रिलायन्स’चे बाजारमूल्य 19 लाख कोटींच्या घरात

Patil_p

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाचे नवे नियम

datta jadhav

आंदोलकांना मिळाली चंद्राबाबूंची साथ

Patil_p

ट्विटरवर कारवाईसाठी सरकार मोकळे

Patil_p

वीज बिल माफीसाठी 19 मार्चला राज्यभर रास्ता रोको आंदोलन

Archana Banage