Tarun Bharat

उत्तर प्रदेश म्हणजे ‘गुंडा राज्य’: सिद्धरामय्या

बेंगळूर/प्रतिनिधी

भाजप सरकारवर संधी मिळताच हल्लाबोल करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर प्रदेशला ‘गुंडांचे राज्य’ म्हटले आहे. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे दुर्दैव आहे की राज्याचे भाजपा सरकार आणि त्याचे मंत्री उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेत आहेत.

कर्नाटक नेहमीच उदार आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. ‘गुंडा राज्य’ म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश कधीही प्रेरणा किंवा मॉडेल स्टेट होऊ शकत नाही. कर्नाटकात ‘लव्ह जिहाद’च्या नावावर धर्मांतर थांबविण्यासाठी कायदा बनविला जाईल, असे राज्य सरकारच्या मंत्र्यांनीकेलेल्या विधानानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून भाजपला जनतेची दिशाभूल करायची आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
न्यायालयाचे असे म्हणणे आहे की आंतर-धार्मिक विवाहासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु असे म्हटले नाही की आंतर-जातीय विवाह करणे चुकीचे आहे. ‘लव्ह जिहाद’ थांबविण्यासाठी कायदा बनवण्याविषयी बोलताना सरकार विविध क्षेत्रातील अपयश लपवण्यासाठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू इच्छित आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

दहावी परीक्षेबाबतचा निर्णय एकतर्फी नाही : येडियुराप्पा

Amit Kulkarni

२ दिवसात २ हजार बेड उपलब्ध करणार : बीबीएमपी मुख्य आयुक्त

Archana Banage

कर्नाटकः आरोग्य कर्मचार्‍यांसह १६ लाख जणांना मिळणार लस

Archana Banage

कर्नाटक: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

Archana Banage

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Archana Banage

हसन मधील ७५ टक्के विद्यार्थ्यांना इंटरनेटचा अभाव

Archana Banage