Tarun Bharat

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना लढवणार ५० ते १०० जागा

मुंबई / प्रतिनिधी

येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते १०० जागा लढवणार असल्याचे सुतोवाच राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

निवडणूक होत असलेल्या देशातील पाच राज्यापैकी उत्तर प्रदेश एक असून देशातील केंद्रीय राजकारणावर या राज्यातील निवडणूकीचा मोठा प्रभाव दिसुन येतो. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने याआधीच कंबर खसली असून काल यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे.

शिवसेना ही उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरण्यास इच्छूक असून या पार्श्वभुमीवर खा. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश दौरा आखला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले ” उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना देशातील ५० ते १०० जागा लढवणार असून यासंदर्भात मी उद्या पश्चिम उत्तर प्रदेशला भेट देणार आहे.”

Related Stories

World Smile Day 2022: जाणून घ्या, दीर्घकाळ तरूण राहण्यासोबत हसण्याचे अनेक फायदे

Archana Banage

निगडीतील त्या युवतीची आई पॉझिटीव्ह

Archana Banage

सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शनवाढीसाठी राष्ट्रीय समन्वय समितीचे शरद पवारांना निवेदन

Archana Banage

सेन्सेक्स 520 अंकांनी वधारला

datta jadhav

अत्याधुनिक ११८ रणगाडे सेनेला अर्पण

Patil_p

नदीपात्रातील अतिक्रमणाचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे आवश्यक

Archana Banage