Tarun Bharat

उत्तर प्रदेश : शहाजहांपुरमध्ये भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / शहाजहांपुर : 


उत्तर प्रदेशातील शहाजहांपुरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहाजहांपुर शहरातील वाजिद खेल मोहल्ल्यात घडली. इथे भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. भिंत कशामुळे पडली याबाबत अजून माहिती मिळाली नाही. 


ज्यावेळी भिंत कोसळली त्यावेळी कुटुंबातील लोकं झोपलेली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

बंगालच्या दुर्गापूरमध्ये भाविकांवर बॉम्बने हल्ला

Patil_p

उद्धव ठाकरे विश्वासघातकी

Patil_p

देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजन कार, गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

datta jadhav

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

Archana Banage

सोने खरेदी महागणार!

datta jadhav

काहींना टाळता आलं असतं ; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया…

Archana Banage