Tarun Bharat

उत्तर बेळगावला केवळ एकच सेक्शन ऑफिसर

हेस्कॉमच्या सावळय़ा गोंधळाचा नागरिकांना फटका, दोन वर्षांपासून पद

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील सहा महिन्यांपासून बंद असणारे पासपोर्ट सेवा केंद्र सोमवारपासून पुन्हा कार्यरत झाले आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात नव्या जागेत हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा कार्यालय कार्यरत झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून पासपोर्ट सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. परंतु याचा फटका बेळगावमधील नागरिकांना बसत होता. त्यांना हुबळी येथे जावून पासपोर्ट काढावा लागत होता. त्यामुळे बेळगावमधील पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात वारंवार करण्यात येत होती. कार्यालयातील जागा अत्यंत कमी असल्यामुळे सामाजिक अंतर पाळणे शक्मय नव्हते. यासाठी पासपोर्ट मंत्रालयाकडून परवानगी मिळण्यास वेळ लागत होता.

वृद्ध तसेच दिव्यांग क्यक्तींना दुसऱया मजल्यावरील कार्यालयात येणे-जाणे कठिण होत असल्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या दुसऱया इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या जागेत प्रशस्त असे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आलेल्या नागरीकांना बाहेर थांबण्यासाठी जागा उपलब्ध आहे. तसेच सर्व ती खबरदारी घेवूनच नागरीकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊनपूर्वी 80 ते 100 नागरीकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. परंतु आता सामाजिक अंतर राखावे लागत असल्यामुळे दिवसात 25 नागरीकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. पोस्ट विभागाच्या कर्मचाऱयांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

Related Stories

रोटरीची 64 वी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स उत्साहात

Patil_p

संभाजीनगर-मच्छे येथील कारखाने बंद करा

Amit Kulkarni

गुरुवारी बाजारपेठेत उसळली गर्दी

Omkar B

दुचाकी अपघातात अकोळचा युवक ठार

Patil_p

निपाणी तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

Patil_p

मनपाकडून विनापरवाना जाहिरात फलक हटविण्याची कारवाई

Amit Kulkarni