ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
डोंगराळ प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील लोकांना मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशाला कडाक्याची थंडी, धुके आणि थंड वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. दिल्ली, युपी हरियाणासह अनेक राज्यांमध्ये सकाळ आणि संध्याकाळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना दैनंदिन कामे करताना देखील अडचणी येत आहेत.


दरम्यान, दाट धुक्यामुळे दुश्यमानता देखील कमी होत आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. दुश्यमानतेमुळे शनिवारी सकाळी देखील 10 ट्रेन्स उशीराने धावत आहेत. जानेवारीत तर थंडीचा कडाका वाढला आहे.
दाट धुक्यामुळे दुश्यमानता कमी झाल्याने रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाला आहे. उत्तर रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी म्हणजेच आज असलेल्या दाट धुक्यामुळे किमान 10 रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.