Tarun Bharat

उत्सुकता गणरायाच्या आगमनाची!

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर : उत्सवासाठी लागणाऱया साहित्याची खरेदी जोरात : गावांमध्ये एकात्मतेचे दर्शन

वार्ताहर /किणये

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्मयातील भक्तांना गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू आहे. आपल्या लाडक्मया बाप्पांच्या स्वागतासाठी सारेजण वेगवेगळय़ा तयारीत गुंतले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मुहूर्तमेढ कार्यक्रम गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेले आहेत. कार्यकर्ते मंडप घालण्यात व सजावट करण्यात दंग आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱया विविध साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरातील बाजारपेठेत साहित्याची खरेदी करताना दिसून येत आहेत.

गणेशोत्सवासाठी लागणारे पूजा साहित्य, किरीट, मोत्यांचा हार, मखर, मंडप सजावटीसाठी साहित्य, डेकोरेशनचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. शहरासह तालुक्मयातील पिरनवाडी, बेळगुंदी, मच्छे, हिंडलगा, उचगाव, कंग्राळी, कडोली, सांबरा, कणबर्गी, हलगा, बस्तवाड, येळ्ळूर आदी ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या असून, सगळीकडेच उत्साह संचारला आहे. आपल्या बाप्पांची मूर्ती आरक्षित करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मंडळाचे मंडप उभारणीसह सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम कार्यकर्ते करताना दिसत आहेत. यंदाही गणेशोत्सव काळात कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे अनेक मंडळांनी ठरविले आहे. ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीव्यतिरिक्त शाडूच्या मूर्ती अधिक प्रमाणात सजविण्यात आल्या आहेत. गणरायाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविताना मूर्तिकार दिसून येत आहेत. तालुक्मयाच्या काही गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापित करण्याची परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम जपली जाणार आहे. एक गाव एक गणपती असणाऱया गावांमध्ये एकात्मतेचे दर्शन दिसून येते. घरगुती गणपतीसाठी सजावटीचे कामकाज जोमाने सुरू आहे. काही भक्तमंडळी घरामध्येही हलते देखावे करताना दिसून येत आहेत. 

Related Stories

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बिजगर्णीत महालक्ष्मी मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni

रोहयोत गैरव्यवहार : 2 कोटींची वसुली रखडली

Amit Kulkarni

सुहास्य परिवारचा वर्धापन दिन उत्साहात

Amit Kulkarni

बळ्ळारी : कर्नाटक-आंध्र सीमेचे सीमांकन २ महिन्यांत पूर्ण होणार

Archana Banage

पर्यायी रेल्वेमार्गासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Omkar B

गजानन जैनोजी पाचवे संघमालक

Amit Kulkarni