Tarun Bharat

उदगाव ग्रामसभा तहकूब; नागरिक आक्रमक

उदगाव / वार्ताहर

उदगाव येथील पाण्याच्या टाकीजवळील झोपडपट्टी अतिक्रमण नियमीत करणे तसेच नूतन पेयजल योजनेच्या लिकेज खर्चावरून कोरम अभावी तहकूब झालेली गाव सभा गुरुवारी दुपारी घेण्यात आली. ही गाव सभा वादळी झाली. शाब्दिक चकमकी बरोबरच यावेळी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी यांना नागरिकांनी धारेवर धरले.

झोपडपट्टी नियमीत करणे याबाबत नामंजूर ठराव केले. चार तास ही सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कलिमुन नदाफ या होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार करत प्रत्येक विषयाचा जाब विचारला. या सभेसाठी युवकांची संख्या जास्त होती. अनेक वर्षात प्रथमच अशी वादळे सभा ग्रामपंचायत मध्ये झाल्याची चर्चा यावेळी होती. काही सदस्यासह ग्रामस्थांनी यावेळी ग्राम विकास अधिकारी यांना कोंडीत पकडले.

Related Stories

सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारिकेचे प्राण वाचले

Archana Banage

Sangli : तासगावातील 200 वर्षाचा पिंपळ वृक्ष कोसळला

Abhijeet Khandekar

चंदूरमध्ये युवकाची आत्महत्त्या

Archana Banage

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अद्याप साडे तीन फूट पाणी

Archana Banage

कोल्हापूर : शिये हायस्कूल शेजारी आढळला अज्ञाताचा मृतदेह

Archana Banage

गव्याच्या हल्ल्यात राधानगरीत शेतमजूर जखमी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!