Tarun Bharat

उदयनराजेंनी शरद पवारांची घेतली भेट

दिल्ली/प्रतिनिधी

आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजप खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. उदयनराजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. पण उदयनराजेंना राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून रान पेटलेलं असताना दिग्गज नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठींमुळे त्यात अधिकत भर पडताना दिसत आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी एकीकडे ममता बॅनर्जींपासून शरद पवार व्हाया संजय राऊत अशा सर्वच नेत्यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे काही जुनी नेतेमंडळी पुन्हा दिलजमाई करताना दिसू लगली आहेत. असंच काहीसं चित्र आज सकाळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या ट्वीटमुळे निर्माण झालं आहे. कारण त्यांच्या ट्वीटमध्ये थेट शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाशी हातमिळवणी केल्यापासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी आणि त्यानंतर साताऱ्यातून त्यांचा झालेला पराभव या गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये कमालीचा विरोध दिसून आला. मात्र, तरीदेखील उदयनराजे भोसले शरद पवारांचा उल्लेख आदराने आणि सन्मानानेच घेताना दिसून आले.

Related Stories

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

Archana Banage

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

datta jadhav

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन कोमात असल्याचा दावा

datta jadhav

कोल्हापूर : पेईंग गेस्टनेच केली रोकड व दागिण्यांची चोरी

Archana Banage

शेतकऱ्यांच्या वीजबिल कपातीबाबत ‘जवाहर’ची बदनामी बंद करा…

Abhijeet Khandekar

महाविकास आघाडी संदर्भात विरोधकांचं कटकारस्थान अपूर्णच राहणार – नवाब मलिक

Archana Banage