Tarun Bharat

उदयनराजे भोसलेंची सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलला भेट

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज तसेच सातारा येथील भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले आपल्या कुटुंबासमवेत गोव्यात वास्तव्यास असून त्यांनी शनिवारी कांपाल येथील सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलला सदिच्छा भेट दिली. भाजपचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शनिवारी घोषणा झाली आहे. यावेळी ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

गोवा हे नेहमीच आवडते ठिकाण

गोवा हे नेहमीच आपले आवडते ठिकाण आहे. त्यामुळे विरंगुळ्यासाठी आपण गोव्यात येत असतो. गोव्यात आल्यावर नेहमीच आपल्याला चांगली बातमी ऐकायला मिळते, असे श्री. भोसले यावेळी म्हणाले. राज्यसभेवर भाजपचे खासदार म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यावर त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राजकारणात आपण अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे योग्यवेळी राजकारणावर बोलू, असे ते म्हणाले. नार्वे येथील सप्तकोटेश्वर देवस्थानाचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. संभाजी महाराजांनीही या दैवताचा आशीर्वाद अनेकवेळा घेतला. लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत अन्यथा या मंदिरात पूजाअर्चा अभिषेक आदी देवकार्य करून सप्तकोटेश्वरांना प्रसन्न करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गोवा सुरक्षित स्थान

गोवा हे सर्वांत सुरक्षित स्थान आहे. गोवा सरकारने कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण ठेवल्याने श्री. भोसले यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. महामारीचा काळ संपल्यावर गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर फारसा परिणाम जाणवणार नाही. गोवा हे आपल्यासह अनेक देशी-विदेशी पर्यटकांचे प्रिय ठिकाण आहे. ते जपले पाहिजे, असे ते म्हणाले.

श्री. भोसले हे 2009, 2014 व 2019 असे तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून सातारा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी आमदार असताना महाराष्ट्र सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

गोवा भेटीत त्यांच्यासमवेत श्रीमती रुशाली, मार्पूस कार्दोज, राजू शिंतरे आदी उपस्थित होते. हेरिटेज हॉटेलचे प्रमोटर प्रीतम बिजलानी व सई ठाकुर बिजलानी तसेच लीना कामत यांनी श्री. भोसले यांचे स्वागत केले. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे पदाधिकारी कुमार प्रियोळकर, गोविंद काळे, ऍन्थनी आझांवेदो आदी उपस्थित होते.

Related Stories

डिचोलीत आज “घुमचे कटर घुम…”

Amit Kulkarni

राज्यातील निवडणुकांच्या तोंडावर, गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी आणि कू यांनी सुरू केले अभियान, मतदानाला देणार प्रोत्साहन

Abhijeet Khandekar

टाटांच्या गुंतवणुकीतून मोठय़ा रोजगारसंधी

Patil_p

गोव्यातील बेकारीचा दर वाढला

Amit Kulkarni

शिक्षकांच्या पगारासाठी पैसा आणावा कुठून?

Patil_p

मंत्री मंडळातील बाबूचा मटका मुख्यमंत्र्यांनी प्रथम बंद करून दाखवावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!