सातारा / प्रतिनिधी
राजकारणात कोणीच कोणाच नसतो. मित्र ही शत्रू असतो आणि शत्रू ही मित्र असतो. त्याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील जनतेने अनेक घटनांत पाहिला आहे. चार वर्षांपूर्वी ज्या शासकीय विश्रामगृहातून खासदार उदयनराजे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांच्यात विस्तव पेटला होता. तो एवढा फुलला होता की दोघेही एकमेकांच्या विरोधात जोरदार टिप्पणी करत होते. पण आज असा काही योग जुळून आला की दोन्ही राजे सर्किट हाऊसमध्ये एक नंबरच्या सूटमध्ये छान पैकी गप्पात मश्गुल होते. त्यामुळे आता चुप्पी बंद झाली असून जादू की झप्पी सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकारणात कोजागिरी पौर्णिमेलाच अशा अचानक घटना शासकीय विश्रामग्रहावर होत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना आला आहे. रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये गेली अनेक महिने वितुष्ट् होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या उदयनराजे यांनी अचानक खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजप मध्ये गेले. लोकसभेच्या पोट निवडणुकीत प्रचरावेळी दोन्ही राजे आणने-सामने आले. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पावसाच्या सभेत रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर सडकून टीका केली. तर लोकसभेच्या या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभवही झाला होता.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कार्यालयात दोघे कधी नव्हे ते एकत्र आले होते पण दोघे ही एकमेकांशी बोलले नव्हते. त्यानंतर उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधून निवडणूक लढवली. त्यावेळी प्रत्येक सभेत रामराजेंनी उदयनराजे यांच्यावर जोरदार टिप्पणी केली होती. एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा ते शासकीय विश्रामग्रहावर येत होते तेव्हा तेव्हा नेहमीच तणाव निर्माण व्हायचा. पोलीस बंदोबस्त ठेवावा लागायचा. आज मात्र हे दोघे राजे एक नंबरच्या सूटमध्ये गप्पा मारत बसले होते.
उदयनराजे, रामराजे यांच्यात जादू की झप्पी…आता नो चुप्पी
Advertisements