Tarun Bharat

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत मोठं म्हणून…”, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई/प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यावरुन भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन केल्याबद्दल टीका केली आहे. त्यांनी उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान, भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांची जयंती आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केल्याची पोस्ट भातखळकर यांनी शेअर केली आहे. या पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हंटले आहे, उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धव ठाकरे सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात.

Related Stories

कोरोना, महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे : आ. पी एन पाटील

Archana Banage

साताऱ्यात दरोडय़ाच्या गुन्हय़ातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Archana Banage

कोरोना : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी महामारीविषयी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

Tousif Mujawar

कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c

उत्तराखंड : या आठवड्यात ‘या’ जिल्ह्यात असणार शनिवार-रविवारी लॉक डाऊन

Tousif Mujawar

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : डॉ नितीन राऊत

Tousif Mujawar