Tarun Bharat

उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन

ऑनलाईन टीम / मुंबई : 

अयोध्येतील रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारनं ट्रस्टला मंजुरी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा केली. या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली.

अभिनंदन करताना ते म्हणाले, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करणयाचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे.

Related Stories

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Archana Banage

राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

दिल्लीत शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात दीड तास चर्चा

Archana Banage

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : छगन भुजबळ

prashant_c

फडणवीसांच्या ‘त्या’ मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

संभाजीराजे यांनी मानले फडणवीस यांचे आभार; मुंबईत घेतली भेट

Abhijeet Khandekar