Tarun Bharat

उद्धव ठाकरेंसाठी बीड ते तिरूपती पायी यात्रा करणाऱ्या शिवसैनिकाचे वाटेतच निधन!

Advertisements

ऑनलाईन टीम /तरुण भारत

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. कट्टर शिवसैनिक असलेले बीडमधील शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला साकडं घालण्यासाठी बीड ते तिरूपतीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. सुमंत रुईकर तिरूपतीला पायी चालत निघाले. तेलंगणा राज्यात ते पोहोचले देखील. पण तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांच्या उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. अखेर तिरुपतीला जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. वाटेतच त्यांचं दुर्दैवी निधन झालं.

Related Stories

सोलापूर : संभाजीराजेंच्या आंदोलनास मराठा बांधवांचा पाठिंबा

Abhijeet Shinde

नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील २५३ कोटींच्या संपत्तीवर टाच

Abhijeet Shinde

परप्रांतीयांच्या जाण्याने भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध

Patil_p

जावली तालुक्यात वालुथच्या सरपंचाने भरवली बेकायदा यात्रा

Patil_p

पुणे विभागातील 4. 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी कबनूर ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!