Tarun Bharat

उद्धव ठाकरे खासगीत बोलले तरी मला कळतं – नारायण राणे

कणकवली/प्रतिनिधी

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगडच्या महाड येथे माध्यमांशी बोलताना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना,केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशा ढवळून निघालं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलं जात आहेत.

पुन्हा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत “नुसतं आडनाव लावलं म्हणजे ठाकरे भाषा होत नाही, बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली, ती शैली तो आवेष आता पाहायला मिळणार नाही. कुणीही आव आणू नका. काहीजण नाकात बोलतात, भाषा शैली नाही… म्हणजे अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत, असं राणे म्हणाले.

यावेळी राणे यांनी नुसतं आडनाव लावलं म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. तशी गुणात्मक कृती दिसली पाहिजे, तर ती ठाकरे भाषा.” असं म्हणत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनीच रेकॉर्ड केलेली कॅसेट मलाही मिळते. मला लांब जायची गरज नाही. कुठे खासगीत बोललं तरी मला कळतं. त्यामुळे सर्व व्यवस्था अगोदरच लावलेली आहे, पाहू आता. असं देखील नारायण राणे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

Related Stories

महाराष्ट्रात बाधितांच्या संख्येत घट; गेल्या 24 तासात 14,452 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

ट्रॅव्हल्सवाल्यांकडून जादा दराने लुट, भाजप युवा मोर्चा आक्रमक; पिळवणूक थांबविण्याचा इशारा

Archana Banage

गंगावेस तालमीतील शड्डूंचा आवाज मंत्रालयात घुमला!

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 312 पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

जतमध्ये विजेच्या धक्क्याने हॉटेल कामगाराचा मृत्यू

Archana Banage

लातूर : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण; मुलालाही संसर्ग

Tousif Mujawar