बेळगाव : हेस्कॉमकडून आवाहन करूनदेखील शहर व उपनगरांमध्ये ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. बऱयाच वेळा या कचऱयाला अज्ञातांकडून आग लावण्याचे प्रकार घडत असल्याने त्याचा फटका ट्रान्स्फॉर्मरला बसत आहे. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मरखालील खुल्या जागेत कचरा टाकू नये, असे आवाहन हेस्कॉमकडून वारंवार करण्यात येत आहे. उद्यमबाग येथील अरुण आयर्न समोरील रस्त्यावर अशाप्रकारे ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकण्यात येत आहे. परिसरातील झाडांचा पाला, प्लास्टिक तसेच कारखान्यांमधून इतर कचरा टाकला जात आहे. या कचऱयाला कोणी आग लावल्यास ट्रान्स्फॉर्मरला झळ बसून नुकसान होण्याची शक्मयता आहे. त्याचसोबत आजूबाजूच्या कारखान्यांनाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.


previous post
next post