Tarun Bharat

उद्यापासून करता येणार बेळगाव-सुरत विमानप्रवास

आठवडय़ातून तीन दिवस सेवा उपलब्ध

प्रतिनिधी/ बेळगाव

गत अनेक दिवसांपासून उत्कंठा वाढविलेली बेळगाव-सुरत विमानसेवा सोमवार दि. 21 पासून सुरू होणार आहे. स्टार एअर ही विमानसेवा सुरू करीत असून बेळगावच्या उद्योजकांना आता अवघ्या काही तासांमध्ये सुरतला पोहोचता येणार आहे. आठवडय़ातून तीन दिवस सेवा देण्यात येणार आहे.

सुरत शहराला दररोज अनेक व्यापारी प्रवास करीत असतात. परंतु विमानसेवा नसल्याने त्यांना रेल्वेने सुरत गाठावे लागत होते. त्यामुळे सुरतला विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. स्टार एअरला उडान 3 अंतर्गत हा मार्ग मंजूर झाला होता. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुरतवरून अजमेरला करता येणार प्रवास

बेळगाववरून अजमेरलाही प्रवास करता येणार आहे. यासाठी सुरत येथे थांबा असणार आहे. बेळगावच्या नागरिकांना अजमेर येथील दर्ग्याला काही तासांमध्ये पोहोचता येणार आहे. अजमेरजवळच्या किशनगड विमानतळापर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे बेळगावच्या प्रवासी संख्येत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेंगळूर सेवेलाही उत्तम प्रतिसाद

सकाळच्या वेळची विमानफेरी स्पाईस जेट कंपनीने तांत्रिक कारणाने बंद केली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूर शहराला विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर शुक्रवारपासून या विमानफेरीला सुरुवात झाली आहे. 50 प्रवासी क्षमता असणाऱया विमानाला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. बेंगळूरला 37 प्रवासी गेले तर बेंगळूरवरून 42 प्रवासी बेळगावला आले. ही सेवा सुरू झाल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी कार्यालयातील अधिकाऱयांना विमान प्रवास करता येणार आहे. 

Related Stories

गटर खोदल्याने रुग्णांना होतोय नाहक त्रास

mithun mane

थकीत बिलासाठी कल्लेहोळ कामगारांचा एल्गार

Patil_p

वाळू तस्करी-चोरटी दारू अड्डय़ावर धाड

Patil_p

काळय़ा यादीतील गुन्हेगारांना तंबी

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुकमध्ये दौडची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

सहआयुक्त आकाश चौगुले यांचे दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Amit Kulkarni