Tarun Bharat

उद्यापासून गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागणार

ऑनलाईन टीम / पुणे :

गाई-म्हशींच्या दूधाच्या दरात उद्यापासून (रविवार) दोन रुपयांची वाढ होणार आहे. पुण्यात झालेल्या कल्याणकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे उद्यापासून गाईचे दूध 48 तर म्हशीचे दूध 58 रुपये प्रतिलिटर दराने ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहे. दूध दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहीणींचे बजेट आता काहीशे कोलमडणार आहे. दरवर्षी हिवाळ्यात दुध उत्पादन वाढते. मात्र, यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने दूध उत्पादन दहा टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे दूध संघाला दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जून्या दरानुसार गाईचे दूध 46 तर म्हशीचे 56 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. उद्यापासून ते अनुक्रमे 48 आणि 58 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Related Stories

सोलापुरात गुरूवारी नव्याने 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

बार्शी बायपास रोडवर लक्झरी बस आणि दुचाकीचा अपघातात एक ठार

Archana Banage

गाडेगावमध्ये खुलेआम वीज चोरी ; कर्मचाऱ्यांची भुमिका ‘चालंलय तर चालु द्या की’

Archana Banage

कलेच्या साधनेत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व

prashant_c

आयुर्वेदिक भस्म विचारमंच स्थापनेसाठी १ फेब्रुवारी रोजी पुण्यात बैठक

prashant_c

अपघाती मृत्यू झालेल्या त्या मनोरुग्ण महिलेवर कदंबा फाउंडेशन च्या पुढाकाराने अंत्यसंस्कार

Patil_p