Tarun Bharat

उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपयांची वाढ

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली महसुलातील कमी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. 

राज्यात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊन झाला. या काळात बरेचसे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारचे महसुली उत्पन्न कमी झाले. त्यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी वित्तविभागाने पेट्रोल- डिझेलवरील मूल्यवर्धित कर वाढवण्याचा निर्णय घेतला.

राज्यात दरमहा सरासरी 11 लाख 66 हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. त्यानुसार 2019-20 मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण 24 हजार 900 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. उद्यापासून होणाऱ्या 2 रुपयांच्या करवाढीमुळे राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नात  दरमहा 300 कोटींची वाढ होईल. 

Related Stories

पंजाबमध्ये कडक निर्बंध : नाईट कर्फ्यूची वेळ एका तासाने वाढवली!

Rohan_P

केबलवर लटकलेल्या महिलेचा ऑन कॅमेरा मृत्यू; झारखंडमधील दुर्घटना

Abhijeet Shinde

भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

datta jadhav

नुकसानग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज : उध्दव ठाकरे

Rohan_P

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पुरात अनेकजण गेले वाहून गेल्याची भीती

datta jadhav

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी २० ऑगस्टला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!