Tarun Bharat

उद्यापासून बेंगळूरमध्ये बससेवा सुरू होणार?

बीएमटीसीकडून परिवहन कर्मचाऱयांना कामावर हजर होण्याची सूचना

प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. राज्य सरकारने केवळ ग्रीन झोनमध्येच राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. आता सोमवारपासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जारी होणार असून राज्य सरकारने बेंगळूर शहर परिवहन मंडळाची (बीएमटीसी) बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

बेंगळूर शहरात कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारने सोमवारपासून येथे बीएमटीसीची प्रवासी बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्याकरिता बीएमटीसीने आपल्या कर्मचाऱयांना सोमवारपासून कामावर हजर होण्याची सूचना केली आहे. त्याकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे येथील परिवहन कर्मचाऱयांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मॅजेस्टीक बसस्थानक, शांतीनगर डेपो, यशवंतपूर डेपो, केंगेरी आणि हेण्णूर बसडेपोत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी केंद्रांवर गर्दी केली आहे. रविवारपर्यंत प्रमाणपत्र मिळविण्याची मूदत कर्मचाऱयांना देण्यात आली आहे.

लॉकडाऊन कालावधीत केवळ आरोग्य सेवेसाठी बसफेऱया सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांनी सोमवारपासून लॉकडाऊन आणखी शिथिल होण्याचे संकेत दिल्यामुळे शुक्रवारी बीएमटीसीने परिवहन कर्मचाऱयांना आरोग्य तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्रासह सोमवारपासून कामावर हजर होण्याची सूचना आदेशपत्रकाद्वारे दिली होती.

Related Stories

कमर्शियल सिलिंडर 32 रुपयांनी महाग

Patil_p

भटक्या कुत्र्यांनाही आहे पोट भरण्याचा अधिकार

Patil_p

शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र

Patil_p

”अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना”

Archana Banage

स्वामी प्रसाद मौर्यांचा ‘सप’प्रवेश

Patil_p

अमरनाथ यात्रेवर शस्त्रात्रांच्या तस्करीचे संकट

Kalyani Amanagi