आयआरसीटीसीवर तिकिटांचे बुकिंग आज सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
उद्या १२ मेपासून प्रवाशांसाठी रेल्वे सुरू करण्याचे रेल्वेने ठरवले आहे. सुरुवातीला 15 जोड्या गाड्या चालवल्या जातील अर्थात ते 15 मार्गांवर धावतील. दिल्लीहून गाड्या चालवल्या जातील. आज, सोमवारी सायंकाळी 4 वाजता आरक्षणाला सुरुवात होईल. या गाड्यांची तिकिटे फक्त आयआरसीटीसी वेबसाइटवर उपलब्ध असतील. या सर्व गाड्यांमध्ये एसी कोच असणार आहेत आणि थांबेसुद्धा अत्यंत मर्यादित असणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकिटांचे दर देखील जास्त असणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशा माहितीचे प्रसिद्धीपत्रक रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केले आहे.
कोणत्या मार्गावर रेल्वे धावणार?
या प्रवासी गाड्या नवी दिल्ली ते दिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई मध्यवर्ती, अहमदाबाद आणि जम्मू तवी या मार्गावर धावतील
रेल्वेने प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान हे केले नियम
स्थानकांवरील तिकिट बुकिंग काऊन्टर बंद राहतील. प्लॅटफॉर्मची तिकिटे, काउंटर तिकिटे दिली जाणार नाहीत. प्रवासादरम्यान फेस कव्हर आवश्यक आहे. सुटण्याच्या वेळी स्क्रिनिंग केले जाईल. ज्या प्रवाशांना संसर्गाची चिन्हे नाहीत त्यांनाच परवानगी दिली जाईल. ज्या प्रवाशांच्या तिकिटांची कन्फर्म केली जाईल त्यांनाच रेल्वे स्थानकात येण्याची परवानगी असेल.
२२ मार्च रोजी गाड्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या आदेशानुसार रेल्वेने 12500 म्हणजेच सर्व प्रवासी गाड्या 22 मार्च ते 31 मार्च दरम्यान थांबविण्याचा निर्णय घेतला होता. नंतर ते 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्याच्या दृष्टीने हे आणखी वाढविण्यात आले. सध्या केंद्र सरकार प्रवासी कामगारांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी कामगार विशेष गाड्या चालवित आहे.


previous post