Tarun Bharat

उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवहार राहणार बंद

Advertisements

उद्योग, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे किसान संघर्ष समितीचे आवाहन

प्रतिनिधी / कोल्हापूर

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिनांक 26 मार्च रोजी अखिल भारतीय बंद पुकारण्यात आलेला आहे. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व लोकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बिंदू चौकात सकाळी दहा वाजता शेतकरी विरोधी संसदेत मंजूर झालेले काळे कायदे मागे घ्या. यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या मांडलेला आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत आहेत. तरी देखील सरकार या आंदोलनाच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आहे. चर्चा वाटाघाटी मध्येच वेळ घालवत आहे. शांततेने चालू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत चाललेला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळी 19 पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे व आपली एकजूट दाखवून दिलेली आहे.

अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत तालुका- तालुका, गाव पातळीवर तसेच शहरात देखील कडकडीत बंद ठेवण्याचे करण्यात आले आहे. या बैठकीला कॉम्रेड नामदेव गावडे, रवी जाधव,टी.एस. पाटील,उदय नारकर, बाळासाहेब नाईक, बी. एल. बर्गे, रमेश वडणगेकर, बाबा मिठारी, वाय. एन. पाटील, बाळासाहेब पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद

Archana Banage

लॉकडाऊनमुळे बाप्पाही झाले ऑनलाईन

Archana Banage

शिरगाव राशिवडे दरम्यान अज्ञाताने लांबवले महिलेचे दागिने

Archana Banage

मिल्कोटेस्टरचा पासवर्ड आता ‘गोकुळ’कडे

Archana Banage

पन्हाळगडावर येताय ? मग जरा जपुनच…

Archana Banage

Kolhapur; राजर्षी शाहू विचारांचा प्रसारासाठी राज्यात जणजागरण यात्रा होणार- मंत्री जितेंद्र आव्हाड

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!