Tarun Bharat

उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे अनेक शहरात लसींचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कडक निर्बंध लादले असून देखील रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे म्हणत महाराष्ट्रात 8 ते 15 दिवस कडक लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. उद्या टास्क फोर्स बरोबर होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय म्हणजेच लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे, असे एकमत या बैठकीत सर्व पक्षांचे झाले आहे. 


यावेळी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेतली असून ते म्हणाले, रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. एक रुग्ण 25 जणांना बाधित करत असल्याने साखळी तोडणे गरजेचे आहे. रुग्णांना ट्रेसिंग करणे कठीण जात आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


पुढे ते म्हणाले, चांगल्या सूचना आल्या आहेत मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल. 


पुढे ते म्हणाले, व्यापऱ्यांशी मी बोललो. होम डिलिव्हरी , टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू. 8 दिवसांनी एक एक गोष्ट सुरू करू. रेमडीसीव्हिर नेहमी लागणार औषध नाही म्हणून ते परदेशातून चायनामधून रॉ मटेरियल लागते. म्हणजे रेमडीसीविरच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात रोड मॅप तयार करणार आणि त्यानंतर लाऊडाऊन लावू.


दरम्यान बैठकीत दरम्यान, कडक लॉकडाऊन लावला नाही तर 15 तारखेनंतर भीषण परिस्थिती भीषण होईल, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे. 


यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सहकार्य करू असे सांगितले. पण संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, रिपोर्ट तातडीने मिळावेत त्यामुळे रुग्ण संख्या कमी होईल, असे सांगत फडणवीस म्हणाले,  राज्यात काय सुरू ठेवता येईल यावर जास्त विचार व्हावा. यासोबतच निर्बंध लावताना सरकारने लोकांचा, व्यापाऱ्यांचा विचार करावा. सध्या राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करावा. परराज्यात आणि परदेशात जात असलेले रेमडेसिविर थांबवले पाहिजेत. नागरिकांचे वीज कनेक्शन तोडू नका असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल. राज्याच्या स्तरावरचा निर्णय पुण्यात 7 दिवस तरी लागू करू नका अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. ते म्हणाले, पुण्यात स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायची मुभा द्या, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले, आव्हानात्मक परिस्थिती आपल्याकडे आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचेही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

Related Stories

मिजोरममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

देशात 24 तासात 1990 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

कोल्हापुरात मंगळवारच्या 39 पॉझिटिव्हने रुग्णसंख्या 83 वरून 122 वर

Archana Banage

‘ते’ राज्यपालांचे वैयक्तिक मत; मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

datta jadhav

अनलॉकच्या पहिल्या दिवशीच दिल्लीकरांना मोठा दिलासा! रुग्ण संख्येत घट

Tousif Mujawar

डोळय़ाचे पारणे फेडणारे काजवा महोत्सव

Patil_p