Tarun Bharat

उद्योगपती प्रकाश घोडके यांच्यासह भगिनी राजमती यांचे अपघाती निधन

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोटचे रहिवाशी मुंबई-चेंबूर येथील उद्योगपती प्रकाश बसवंत घोडके यांचे दि.28 रोजी दुपारी एकच्या दरम्यान पुणे तळेगाव-दाभाडे हायवेवर कार पलटी होऊन अपघाती निधन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी राजमती नागेश गाडेकर यांचेही निधन झाले.

आज मोठ्या भावाच्या मुलाचा भुसनूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथे साखरपुडा कार्यक्रम असल्याने मंगळवारी दुपारी 1 वाजता चेंबरवरुन अक्कलकोटला निघाले होते. मुंबई हायवेवर तळेगाव-दाभाडे येथे कार अचानक पलटी होवून यामध्ये बहिण-भाऊ जागेवरच मरण पावले.प्रकाश घोडके व त्यांच्या भगिननीच्या मृत्यूची वार्ता अक्कलकोट येथे समजताच खासबाग, बुधवार पेठ, धनगर गल्ली येथे शोककळा पसरली.

प्रकाश घोडके यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तर त्यांच्या भगिनी राजमती गाडेकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भाऊ-बहिणीच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्य परिवहन महामंडळ अक्कलकोट आगाराचे माजी चालक अप्पाशा घोडके यांचे धाकटे बहिण-भाऊ होत. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 10 वाजता खासबाग गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

Related Stories

मराठा आरक्षण : केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळली

Archana Banage

पंढरपूर बसस्थानकातून सुटल्या खासगी बस

Abhijeet Khandekar

राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये- चंद्रशेखर बावनकुळे

Archana Banage

शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Abhijeet Khandekar

डॉ. अनिल अवचट यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

Tousif Mujawar

हल्दीराम : फॅक्टरीत गॅस गळतीने एकाचा मृत्यू, 3 गंभीर

prashant_c