Tarun Bharat

उद्योगाच्या संधींमध्ये महिलांना अग्रक्रम आवश्यक

प्रतिनिधी/ बेळगाव

उद्योगाच्या संधींमध्ये महिलांना अग्रक्रम मिळाला पाहिजे. त्याचबरोबर महिलांनी कामाची गुणवत्ता वाढवून स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. बदलते विचार कृतीत आणणे  महत्त्वाचे आहे. महिला उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योजकता वाढीस लावली पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी काढले.

आम्ही उद्योगिनी प्रति÷ान आयोजित राज्यव्यापी महिला उद्योगिनी परिषदेला रविवारी प्रारंभ झाला. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातील बी. एन. वैद्य सभागृहात या राज्यव्यापी परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर निलम गोरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, समाजात स्त्रियांचे निम्मे बळ आहे. परंतु त्यांच्या नावे असलेल्या संपत्तीचे प्रमाण नगण्य आहे. गृहिणींचे मोल कायम अदृश्यच राहिले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता आणणे महत्त्वाचे आहे. ही समानता आणण्याच्यादृष्टीने महिलांसाठी औद्योगिक धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. महिला उद्योजकांना भेडसावणाऱया अडचणींबाबत विचारविनिमय करण्यासाठी उद्योग, पर्यटन, ग्रामविकास, कृषी अशा विविध क्षेत्रातील अधिकाऱयांची येत्या एप्रिलमध्ये लवकरच बैठक घेणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

व्यासपीठावर नागपूर स्वयंपूर्ण बहुद्देशीय संस्थेच्या कांचन अधिकारी, अभिनेते भरत दाभोळकर, हैदराबादच्या भगवती बलदेवा, गिरीष चितळे, डॉ. हरसोलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही उद्योगिनी प्रति÷ानच्या प्रमुख मीनल मोहाडीकर यांनी 23 वर्षांपूर्वी प्रति÷ानची स्थापना झाली. आज मुंबईमध्ये 8 आणि मुंबईबाहेर 8 अशी उद्योगिनीची एकूण 16 केंदे आहेत, असे सांगून प्रति÷ानच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी भरत दाभोळकर यांनी आपले अनुभव कथन करून उद्योग क्षेत्रात वेगळेपण जपण्याची गरज व्यक्त केली. एक-दुसरीचे अनुकरण करण्यापेक्षा उद्योगांमध्ये वेगळे काय करता येईल याचा सातत्याने विचार करायला हवा. जाहिरात आकर्षक हवी परंतु टॅगलाईनसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, असे दाभोळकर यांनी सांगितले. या क्षेत्रामध्ये काम करताना काही जाहिरातींना आक्षेप घेऊन गदारोळ उठवला जातो. परंतु धारिष्टय़ाने उभे राहणे महत्त्वाचे असते. अपयशाला घाबरून मागे हटायचे नाही तर त्यावर मात करणे महत्त्वाचे, असेही त्यांनी सांगितले.

चितळे उद्योग समूहाचे गिरीष चितळे यांनी महिला उद्योजक परिषदेला शुभेच्छा देऊन पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरला की त्याचे उद्योगामध्ये कसे रुपांतर होऊ शकते याचा दाखला दिला. चितळे उद्योग समूहात प्रामुख्याने महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. त्याची सुरुवात आपल्या आजीपासून झाली, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. यावेळी भगवती बलदेवा आणि कांचन अधिकारी यांचीही समयोचित भाषणे झाली.

सूत्रसंचालन अनघा मोडक व दुहिता सोमण यांनी केले. या परिषदेला महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथून 1000 हून अधिक महिला उद्योजिका आल्या आहेत.

Related Stories

पंत बाळेकुंद्रीला बसफेऱया वाढवा

Amit Kulkarni

शहरातील अनेक आरओ प्लान्ट नादुरुस्त

Amit Kulkarni

श्री लक्ष्मी-वेंकटेश्वर देवस्थानचा वर्धापन दिन उत्साहात

Amit Kulkarni

मजगाव महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

Omkar B

क्रीडांगणाला येळ्ळूर ग्रा.पं. सदस्यांकडून जोरदार विरोध

Amit Kulkarni

मराठा मंडळ अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्र

Sandeep Gawade