Tarun Bharat

उद्योग खात्रीतून 40 हजार कामगारांना काम

सर्वाधिक कामे अथणी, गोकाक, हुक्केरी तालुक्मयात : कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव

उद्योग खात्रीतून जिह्यातील अनेक कामांना गती मिळत आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पाऊस नसलेल्या तालुक्मयांमध्ये चालना देण्यात आली आहे. पावसाळा संपत आला असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बेळगाव जिह्यातील गोकाक, अथणी व हुक्केरी तालुक्मयात अधिक प्रमाणात कामे करण्यात येत असून दररोज जिल्हय़ात 40 हजार कामगारांना काम देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसामुळे जिह्यातील उद्योग खात्रीतील कामांना काही अंशी स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या कामांना चालना देण्यात आली असून अनेक तालुक्मयांमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळणार आहे. बेळगाव जिह्यात आता मोठय़ा प्रमाणात काम उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

बेळगाव जिह्यात आता दररोज 40 हजार 500 च्या आसपास कामगारांना काम देण्यात येत आहे. आता यामध्ये लवकरच वाढ करण्यात येणार असून याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

जिह्यातील प्रत्येक तालुक्मयातील विविध गावांत उद्योग खात्री योजनेच्या कामांना चालना देण्यात आली आहे. गावात काम नसले तरी वनविभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार करुन आता सध्या जिह्यातील अथणी तालुक्मयात 6 हजार, गोकाक तालुक्मयात 5 हजार व हुक्केरी तालुक्मयात 6 हजार कामगारांना दररोज कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही संख्या आता 70 हजारांवर जाण्याची शक्मयता आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यावषी पुरामुळे प्रत्येक गावात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याची काळजी घेऊन गावागावात उद्योग खात्रीतून कामे देण्यावर भर देण्यात येत आहे. याचबरोबर सध्या पावसामुळेही काही प्रमाणात कामे बंद ठेवली होती. तर जिह्यात कमी पाऊस असलेल्या ठिकाणीही कामे देण्यात आली. मात्र अजूनही पावसामुळे कामांना गती देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या कामांना सुरूवात झाल्याने अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

काम कधी मिळणार याकडेच अनेकांच्या नजरा

बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्रीची कामे मोठय़ा प्रमाणात चालतात. एका बेळगाव तालुक्मयात साधारणतः 10 ते 15 हजार कामगारांना काम देण्यात येते. मात्र आता सध्या पावसामुळे काही अंशी काम कमी आहे. लवकरच आराखडा तयार करुन कामे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आपल्याला काम कधी मिळणार याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बेळगाव तालुक्मयात केवळ 2 हजार 500 कामगारांना काम देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध आहे.

सध्या सुरू असलेली आकडेवारी

तालुकाकामगारांची संख्या
अथणी5973
बेळगाव2579
बैलहोंगल2409
चिकोडी3020
हुक्केरी6119
कागवाड466
खानापूर3210
कित्तूर1559
मुडलगी1737
निपाणी1828
रामदुर्ग3230
रायबाग1834
सौंदत्ती2907
गोकाक4591
एकूण41461

Related Stories

जाचक आयकर-जीएसटीच्या अटींविरोधात कर व्यावसायिकांचे आंदोलन

Omkar B

डोळय़ांची काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

आरटीई अंतर्गत शाळेचे थकीत वेतन त्वरीत मंजुर करावे

Patil_p

पंतप्रधानांच्या आवाहनाला शहरवासियांचा प्रतिसाद

Patil_p

बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण

Patil_p

धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ

Patil_p