Tarun Bharat

उद्योग खात्रीत कमी पगार दिल्यामुळे कल्लेहोळ कर्मचाऱयांचे आंदोलन

कामाच्या ठिकाणी ठिय्या : पिडीओ व कर्मचारी पैसे खाल्याचा आरोप

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव तालुक्मयाबरोबरच जिह्यातही मोठय़ा प्रमाणात उद्योग खात्री योजनेतून कामे करण्यात येत आहेत. मात्र बेळगाव तालुक्मयातील कल्लेहोळ येथे काम करणाऱया कामगारांना कमी वेतन देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी कामावरच आंदोलन छेडून याचा निषेध करण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

3 बाय 3 आकाराचा खड्डा खोदल्यानंतर एका कामगाराला एक दिवसाचे वेतन मिळते. मात्र काम कमी झाल्याचे सांगून त्यांच्याकडून 4 ते 6 फूट खोदाई करून घेण्यात आली आहे. एवढे काम करून देखील मापामध्ये ते अजून कमी पडतेय हे कारण पुढे कर्मचाऱयांना 54 ते 60 रुपये वेतन काढण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱयांतून संताप व्यक्त करण्यात आला.

याचबरोबर काम करणाऱया कर्मचाऱयांना पाण्याची सोय नाही की प्रथमोपचारासाठी वैद्यकीय औषधेही नाहीत. त्यामुळे या साऱया समस्या तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्यासमोर मांडण्यात आल्या. त्यांनी तातडीने संबंधित पिडीओंना बोलावून याची चौकशी केली. सुमारे 300 हून अधिक महिलांनी पिडीओंना चांगलेच धारेवर धरले.

गोंधळ वाढताच याबाबतची चौकशी करून सुनील अष्टेकर यांनी संबंधितांना शांत केले. पिडीओंना याबाबत विचारले असता त्यांनी यांनी केलेले काम मापामध्ये बसत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे, असे सांगितले. मात्र कामगारांनी ज्या ठिकाणी घट्ट जमीन आहे त्या ठिकाणी काम दिल्यावर आम्ही काय करायचे? असा सवाल उपस्थित केला. घट्ट असलेल्या ठिकाणी यंत्रे लावून काम करण्याचा नियम असून आम्हाला योग्य ठिकाणी काम देण्याची मागणी केली. यावर यापुढे तशा प्रकारे आपण काम देऊ,, असे आश्वासन पिडीओ यांनी दिले. त्यानंतर हा गोंधळ थांबला..

Related Stories

उचगाव प्राथमिक मराठी शाळेत स्मार्टरुमचे उद्घाटन

Amit Kulkarni

मंगळवारी बाजारपेठेवर परिणाम

Amit Kulkarni

बेळगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 टक्क्मयाखाली

Omkar B

रिंगरोडचा प्रयत्न हाणून पाडणार

Patil_p

अखेर अनगोळ रस्त्यावरील जलवाहिनीची दुरुस्ती

Amit Kulkarni

भाजप उमेदवाराचा सोमवारी उत्तर मतदारसंघात प्रचार

Amit Kulkarni