Tarun Bharat

उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु -पालकमंत्री

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हयातील उद्योग वाढीसाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. अमृत महोत्सवी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गणेश आरतीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते असोसिएशनच्या श्री.गणेशाची आरती संपन्न झाली.

प्रशासक कादंबरी बलकवडे आणि पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना येथील फोटो गॅलरी आवडली. आपल्या असोसिएशने येथील उद्योगाचा पाया भक्कम आणि मजूबत केंला आहे. अशी प्रतिक्रया शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली. पूर परिस्थितीत अधिक्षक. बलकवडे यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शिवाजी उद्यमनगर येथे अंडरग्राउड विजेच्या तारा टाकून उद्योगांना अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी महापालिकेने सहकार्य करून अंडरग्राउड वायरिंग करण्यासाठी परवानगी मिळावी. तसेच त्यापोटीचे शुल्कही माफक आकारावे अशी मागणी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी या प्रकरणी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जागेची मोठी समस्या आहे, ही समस्या सोडवावी अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी यावेळी केली. या समस्या सोडविण्यासाठी सर्व ती मदत शासना तर्फे केली जाईल असे आश्वासन .पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी सचिन मेनन, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, रणजीत शाह, संजय अंगडी, नितिन वाडीकर, बाबासा कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदिप मांगोरे, अभिषेक सावेकर,प्रदीप व्हरांबळे आदी.उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह संख्या हजारावर

Archana Banage

कसबा बावड्यात युवकावर पूर्ववैमस्यातून खुनी हल्ला

Archana Banage

गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे भूमिका मांडणार

Archana Banage

नेव्हीच्या सैनिकांना गोकुळच्या दुधाचा `’बुस्ट’

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात डेंग्यू, चिकनगुनियाचा फैलाव

Archana Banage

राम नवमी निमित्त शहरात उद्या शोभा यात्रेचे आयोजन

Abhijeet Khandekar