Tarun Bharat

उद्योजकांनी भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे जिह्यातील उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपापल्या राज्यात गेले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्यामुळे जिह्यातील उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत, पण त्यांना कुशल कामगारांची कमतरता भासत आहे, तरी जिह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.

जिह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, सहायक आयुक्त कौशल्य विकास सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

जिह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई पुढे म्हणाले, एमआयडीसींमध्ये परप्रांतीय मोठय़ा प्रमाणात कामावर होते ते आता आपल्या राज्यात निघून गेले आहे त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल व  जिह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात  प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.  

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या..

एमआयडीसीतील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल. 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या.

Related Stories

चुना कसा लावायचा हे वेळ आल्यावर दाखवेन ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

Archana Banage

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

datta jadhav

मुख्यमंत्री मायभूमीतील शेतकऱयांच्या बांधावर

Patil_p

Satara : शिवशाही बसमधून 21 लाखाचे दागिने चोरणारे चोरटे गजाआड

Abhijeet Khandekar

तुम्ही मुंबईत या, मी स्वतः तुमच्या स्वागताला येईन- संजय राऊत

Archana Banage

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य शासनाकडून ‘या’ दोन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी

Archana Banage
error: Content is protected !!